COPA हा ट्रेड संगणकावर आधारित एक वर्षाचा अत्यंत लोकप्रिय व मागणी असलेला कोर्स आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर ऑपरेटिंग, बेसिक प्रोग्रामिंग, डेटा एंट्री, इंटरनेट वापर, ऑफिस अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर्स, वेब डिझायनिंग इत्यादींचे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते.
मुख्य विषय:
प्रशिक्षण पद्धती:
संपूर्ण प्रशिक्षण हे संगणक प्रयोगशाळेत प्रात्यक्षिकांवर आधारित असून, प्रत्येक विद्यार्थ्याला संगणकावर वैयक्तिक सरावाची संधी दिली जाते. अनुभवसंपन्न प्रशिक्षक विद्यार्थ्यांना सैद्धांतिक व प्रात्यक्षिक दोन्ही पद्धतीने मार्गदर्शन करतात.
करिअर संधी:
कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना खालील क्षेत्रात नोकरी व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतात:
कोर्स कालावधी: 1 वर्ष
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
प्रवेश क्षमता: 24 विद्यार्थी